पुस्तकाचे मुखपृष्ठ

पुस्तकाचे मुखपृष्ठ

“मी असा कसा” ही शून्यातून आपले जग निर्माण करणाऱ्या एका व्यक्तीची जीवनकहाणी आहे. गरीब कुटुंबात अशिक्षित आई-वडिलांच्या पोटी जन्मलेले ऍड.मनोहर आडपईकर यांना लहानपणापासूनच संकटांना सामोरे जावे लागले. प्रतिकूलतेशी त्यांनी केलेल्या लढ्याचा हा लेखाजोखा. गोव्यातील त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचा तपशीलही पुस्तकात दिला आहे. कामगार संघटना भारतीय मजदूर संघासाठीचे कार्य, मराठीला राज्यभाषेचा दर्जा मिळावा यासाठीतल्या आंदोलनातला त्यांचा सहभाग, गोव्यात भाजपच्या प्रसारासाठीचे त्यांचे काम व निवडणुकीचे राजकारण आणि भंडारी समाजाच्या हितासाठीचे त्यांचे प्रयत्न ह्यांचा पुस्तकात समावेश आहे.

परिणामाची पर्वा न करता अन्यायाविरुद्ध धावून जाण्याचा स्वभावधर्म असलेल्या श्री मनोहर आडपईकर ह्यांचं हे आत्मचरित्र म्हणजे आव्हानांवर मात करून जीवनात विजय कसा मिळवता येतो याची प्रेरणादायी कथा आहे.

२९ मे २०२३ रोजी गोव्याचे माननीय राज्यपाल श्री प.स.श्रीधरन पिल्ले यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेल्या “नयी पेहल” योजनेअंतर्गत मी असा कसा ह्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक आता ऑर्डर करण्यासाठी उपलब्ध आहे.

प्रत पाहिजे असल्यास कृपया खालील ऑर्डर फॉर्म भरून पाठवावा.

ऑर्डर फॉर्म