प्रस्तावना


माझे मित्र श्री. मनोहर आडपईकर यानी आपल्या आत्मचरित्राची कच्ची प्रत मला वाचायला दिली आणि मी ती एका दमात वाचून काढली. बालपणापासून मला वाचनाची आवड आहेच. त्यामुळे मिळेल ते पुस्तक वाचून काढायचे हा माझा आवडता छंद आहे. एकेकाळी मला बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यकथांनी मोहिनी घातली होती. पण हळूहळू कोणत्या प्रकारच्या वाचनाला प्राधान्य द्यावे हे कळू लागले. मला आज 'आत्मचरित्र ' या साहित्य प्रकाराने मोहिनी घातली आहे. मुख्य म्हणजे आत्मचरित्रातील प्रसंग सत्य असतात त्यामुळे लेखकाच्या सुखदुःखाशी आपण एकरूप होऊ शकतो. श्री. मनोहर आइपईकर आणि मी गेली जवळ जवळ पन्नास वर्षे एकत्रितपणे सामाजिक क्षेत्रात काम करत आहोत. त्यामुळे त्यांच्या जीवनातील काही घटनांचा मीही साक्षिदार आहे. पण त्यांचे बालपण आणि त्या काळातील त्यांचे शिक्षण हा विषय मला नविन आहे. घरची गरिबी आणि त्यामुळे त्यानी विद्यार्जनासाठी सोसलेले अपार कष्ट माझे काळीज भेट्न गेले. पैश्याची प्रचंड चणचण असतानाही दुकानमालकाचे पंधरा हजार रुपये जसेच्या तसे परत केिले हा त्यांचा प्रामाणिकपणा अगदी या क्षणापर्यंत टिकून आहे.

अत्यंत विपरित परिस्थितीत लेखकाने घेतलेला शिक्षणाचा ध्यास हा या आत्मचरित्रातला मला सर्वात जास्त आवडलेला भाग. मी एक निवृत्त शिक्षक. त्यामुळे संघर्ष करत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याबद्दल मला प्रेम या आत्मचरित्रातला मला सर्वात जास्त आवडलेला भाग. मी एक निवृत्त शिक्षक. त्यामुळे संघर्ष करत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याबद्दल मला प्रेम आणि आदर वाटतो. त्यांच्या भावाचा त्यांच्या शिक्षणाला विरोध होता आणि एके दिवशी त्याने श्री. मनोहर आडपईकरांची सर्व पुस्तके जाळून टाकली. तरीही लेखकाने शिक्षणाचा ध्यास सोडला नाही. अशावेळी त्यांच्या मदतीला धावून आले ते अँड. दिलीप सावर्डेकर आणि शिक्षक श्री. ऑलपियो डायस, या दोघांनाही मी पाहिलेले नाही. पण श्री. मनोहर आइपईकरांच्या आत्मचरित्रामुळे त्यांची ओळख झाली. श्री. आडपईकरांनी आपल्या जीवनात यशाचा जो स्तंभ उभा केला त्याचा पाया या दोघांनी घातला. त्यामुळे या दोघांच्या स्मृतीला वंदन. श्री. आडपईकरांची शिक्षणाची तळमळ, त्यासाठी त्यांनी सोसलेले कष्ट या गोष्टी आजच्या पिढीपर्यंत पोचाव्यात असे मला मनोमन वाटायचे. त्यासाठी हे पुस्तक लवकरात लवकर छापा असा माझा आग्रह होता. आज तो योग आलाय. त्यामुळे लेखका इतकाच मलाही आनंद झालाय.

अन्यायाविरुद्ध झगडणे हा श्री. आडपईकरांचा आणखी एक गुण, त्यांनी विद्यार्थी दशेपासूनच जपलाय. त्यांच्याच शाळेतील एक शिक्षक महिलावर्गाकडे वाईट नजरेने पहात असे. श्री. आडपईकरांनी त्याला विरोध तर केलाच पण त्याच्या जीवनावर एक नाट्यछटा लिहून ती शाळेतच सादर करण्याचे धाडस त्यांनी दाखवले. त्या शिक्षकाने श्री. आडपईकरांवर सूड उगवण्याचा प्रयत्न केला पण श्री. आडपईकरांनी त्याला धैर्याने तोंड दिले. पुढे नोकरीच्या काळातही त्यानी सत्याची पाठराखण केली आणि पोस्ट खात्यातील आपल्या साहेबाबरोबर यशस्वी लढत दिली. हे सारे प्रसंग वाचकांच्या मनावर निश्चितच संस्कार करतील.

पुढे श्री. मनोहर आडपईकरांनी भारतीय डाक कर्मचारी संघ, विश्व हिंदू परिषद, भा.ज.प. आदि विविध क्षेत्रात काम केले. आजही ते करत आहेत पण प्रत्येक क्षेत्रात त्यांनी प्रामाणिकपणा, ईमानदारी, स्वाभीमान हे आपले गुण प्राणपणाने जपले. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात त्यांना जिवाभावाचे कार्यकर्ते मिळाले. पण त्याचवरोवर कडवे प्रतिस्पर्धीही भेटले. त्याचा त्यांच्या आत्मचरित्रात जागोजागी प्रत्यय येतो.

आयुष्यातल्या प्रत्येक क्षेत्रात श्री. आडपईकरांनी सचोटीने काम केले. त्यामुळे त्यांनी माणसेही जोडली. त्याचे फळही त्याना मिळाले. त्यांचा मुलगा मिलींद उच्चशिक्षित तर झालाच शिवाय आज तो कॅनडात उच्च पदावर काम मिलाद उच्चशिक्षित तर झालाच शिवाय आज ती कनडात उच्च पदावर काम करतोय. त्या निमित्ताने श्री. आडपईकरांनी कॅनडाचाही प्रवास केला. त्याचेही वर्णन या आत्मचरित्रात आहे. या निमित्ताने त्यांना लंडन विमानतळावर मदत करणारी ती महिला कर्मचारी माझ्याही मनात आदराचे स्थान मिळवून गेली. आपण इंग्रजांच्याकडून अनेक चुकीच्या गोष्टी शिकलो पण या महिला कर्मचाऱ्याने दाखविलेली माणुसकी आणि कर्तव्यतत्परता माझ्या मनात कायमचं घर करून राहिली. मुख्य म्हणजे शेवटपर्यंत तिने आपले नाव व पत्ता सांगितला नाही. कॅनडातील आपल्या मुक्कामात वार्गत काम करणाऱ्या एका प्रच महिलेबाबतचा अनुभव सांगितला आहे. तिने फ्रेंच भाषेव्यतिरिक्त अन्य कुठल्याही भाषेत बोलायला नकार दिला. या प्रसंगी श्री. आडपईकरांनी गोव्यातल्या मराठी चळवळी संबंधी आपली खंत व्यक्त केली आहे. अरे हो! लिहायचं राहूनच गेलं. माझ्या आणि श्री. आडपईकरांच्या मैत्रितील समान धागा म्हणजे श्री. मनोहर आडपईकरांची मराठीवरची निष्ठा. खरं म्हणजे आमची मैत्री घट्ट टिकून रहायला एक कारण म्हणजे त्यांचे मराठी प्रेम. अत्यंत साध्या पण अत्यंत ओघवत्या भाषेत त्यांनी लिहिलेले आत्मचरित्र त्यांच्या मराठी प्रेमाची साक्ष देते.

आम्ही दोघेही समान वयाचे. पण म्हातारपणामुळे व आजारपणामुळे मी सार्वजनिक जीवनातून निवृत्त झालोय, तसं श्री आडपईकर नव्या नव्या जबाबदाऱ्या स्वीकारून पुढे जात आहेत. देवाने त्यांना उदंड आयुष्य सुख व यश द्यावे अशी प्रार्थना करतो.

- व्यंकटेश नारायण कुलकर्णी